बॉलीवूड करिअरला 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल बॉबी देओलने सोमवारी ट्विटरवर एक अत्यंत भावनिक पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये त्याने सर्व संबंधितांना धन्यवाद तर दिले आहेच.
त्याशिवाय आपल्या करिअरला जेथून सुरुवात झाली, त्याचे स्मरणही केले आहे. बॉबी देओलने ऑक्टोबर 1995 मध्ये बॉलीवूडमधील करिअरला सुरुवात केली होती.
या 25 वर्षात आपण अनेक उतार-चढाव बघितले. या 25 वर्षांनी आपल्याला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट शिकवली, ती म्हणजे कधीही हार मानायची नाही.
नेहमी “बाऊन्स बॅक’ करायचे आणि पुढे जातच रहायचे, हे आपल्याला बॉलीवूडने शिकवले, असे बॉबीने म्हटले आहे. या इमोशनल पोस्टच्या बरोबर बॉबी देओलने स्वतःचा एक फोटोही शेअर केला आहे.
हा फोटो त्याच्या सिनेमांच्या पोस्टरच्या कोलाजने तयार केला अहे. “25 यर्स ऑफ लाईट, कॅमेरा, ऍक्शन. हंबल्ड ऍन्ड ग्रेटफूल’ असे या फोटोमध्ये त्याने लिहिले आहे. आपल्या आगामी 25 वर्षांबाबतही त्याने म्हटले आहे.
प्रेक्षकांच्या पाठिंब्याने आपण आणखी 25 वर्षेही प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास तयार आहोत. आपल्या अखेरच्या क्षणापर्यंत आपण प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहोत, असेही बॉबीने म्हटले आहे.