मुंबई – महाराष्ट्र आणिमुंबई पोलिसांच्या चौकशीला बदनाम करण्यासाठी ८० हजारहून अधिक बनावट खाती तयार केली होती. हा मुद्दा चर्चेत असतानाच राज्याचे गृहनिर्माण मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या नावेही फेक अकाऊंट सुरू असल्याचं समोर आलं आहे.
मुंबई पोलिसांच्या बदनामीसाठी तब्बल ८० हजार फेक अकाऊंट्स
This is a fake account and is being misused
I m reporting to @MumbaiPolice @CPMumbaiPolice @MahaCyber1 @ThaneCityPolice pic.twitter.com/huhyHRysvB— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) October 6, 2020
या फेक अकाऊंट बाबत स्वःताहा जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून पोलिसांकडे तक्रार केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत या फेक अकाऊंटची मुंबईचे पोलीस आयुक्त, मुंबई पोलीस व महाराष्ट्र सायबर सेलकडे तक्रार केली आहे.
महाराष्ट्रातील जनता तुमचा बाजार उठविणार
दरम्यान, मुंबई पोलिसांची खोटी बदनामी करायला तुम्हाला ८० हजार फेक अकाउंट्स काढण्यात आली होती. त्यामाध्यमातून बदनामी केली गेली, अशी धक्कादायक माहिती समोर आली होती.