सिंधुदुर्ग – सिंधुदुर्गात मच्छीमारासाठी गेलेल्या बोटीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी सकाळच्या सुमारास घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हद्दीतील एका मत्स्य व्यावसायिकाने मच्छीमारीसाठी समुद्रात बोट नेली होती.
देवगडपासून जवळपास 18 वाव ही बोट आतमध्ये नेली होती. त्यावेळी या बोटीने अचानक पेट घेतला. सुदैवाने बोटीतील मच्छीमारांना सुखरूप वाचवण्यात आल्याने जीवितहानी टळली. मात्र अद्याप या बोटीला आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही.