मुंबई – ‘चला हवा येऊ द्या’ फेम मराठी अभिनेत्री श्रेया बुगडे प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. आपल्या अभिनयाने श्रेया प्रेक्षकांचे मनोरंजन करते. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. श्रेया सोशल मीडियावर सक्रीय असते. सध्या ती उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. नुकतेच तिने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
श्रेयाने इनस्टाग्रामवर तिचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती जांभळ्या रंगाच्या मोनोकिनीमधील आऊटफिटमध्ये दिसत आहे. यात तिने एकापेक्षा एक हटके पोज दिल्या आहेत. यातील एका फोटो ती निळ्याशार समुद्राकडे पाहताना दिसते, तर आणखी एका फोटोत ती निवांत पुस्तक वाचताना दिसते. या फोटोंमध्ये तिचा चेहऱ्यावरील आनंद स्पष्टपणे दिसत आहे.
View this post on Instagram
हे खास फोटो शेअर करत तिने ‘संपू नये असा उन्हाळा… तुम्ही मी माझ्या फोनमधील काही आवडते फोटो पाहत आहात,’ असे कॅप्शन दिले आहे. सध्या तिच्या फोटोवर अनेक सेलिब्रिटींनी लाइक आणि कमेन्ट केली आहे. अभिनेता अभिजीत खांडकेकरने ‘नको ना यार’ आणि अभिज्ञा भावेने ‘अग्गं बाई’ अशी कमेंट केली आहे.