राजगुरूनगर -गणेशोत्सवा निमित्त सामाजिक बांधिलकी जपत येथील क्रांतीवीर राजगुरू मित्र मंडळ (बाजारपेठचा राजा) व अविनाश कहाणे युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत व सोशल डीस्टन्सचे पालन करून रक्तदान शिबिर घेतले. या शिबिरात 55 जणांनी रक्तदान केले. या शिबिराचे उद्घाटन खेड पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक राहुल लाड यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पुणे जिल्हा छावा संघटना अध्यक्ष सोमनाथ ढोले, माजी नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील वाळुंज, बाळासाहेब कहाणे, धनंजय कहाणे, अरविंद गायकवाड, मच्छिंद्र पवळे, राहुल पिंगळे, पोलीस हवालदार राजेश नलावडे यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते हे उपस्थित होते.