चिंबळी-वाकी बुद्रुक येथील ग्रामस्थांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर ठेवून आणि स्वच्छता बाळगत रक्तदान केले गेले. यावेळी एकूण 101 रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले.
यावेळी सभापती अंकुश राक्षे, गटविकास अधिकारी अजय जोशी, आरोग्य अधिकारी बळीराम गाढवे, सदस्य भगवान पोखरकर, मच्छिंद्र गावडे यांनी शिबिराला भेट दिली. रक्तदात्यांचे कौतुक केले. ससून रुग्णालय रक्तपेढी यांच्या माध्यमातून रक्त संकलन केले गेले. यावेळी वाकी बुद्रुक गावच्या उपसरपंच सुनीता कड, ग्रामसेवक भंडारे, पप्पू टोपे, विकास जाधव, सुनील टोपे, संतोष गारगोटे, प्रा. रोहित गुरव आदी उपस्थित होते.