पुणे – यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर (Mumbai-Pune Expressway) ‘हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टम’ अंतर्गत मुंबई-पुणे (Mumbai Pune Road) मार्गावरील ढेकू गाव याठिकाणी गॅन्ट्री उभारण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी बुधवारी (दि.8) दुपारी अर्धा तासासाठी महामार्गावरील वाहतुक बंद ठेवण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (Maharashtra State Road Development Corporation) वतीने सुरू असलेल्या कामामध्ये ढेकू या गावात ग्रॅन्ट्री टाकण्याचे काम करण्यासाठी उद्या (8 नोव्हेंबर) दुपारी दोन टप्यात ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामध्ये पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतुक दुपारी दोन ते अडीच या वेळेत बंद राहील. तर अडीच वाजता वाहतुक सुरळीत सुरू होईल. (Mumbai-Pune Expressway block)
मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक दुपारी अडीच ते तीन या वेळेत बंद राहील. हा महामार्ग तीन वाजता वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सांगण्यात आले.