खालापूर, (वार्ताहर) – मुंबई – पुणे जुन्या महामार्गावरील बोरघाटात मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या स्कोडा कारला शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागल्याने या आगीत स्कोडा कार पूर्णपणे जळून खाक झाली.
मुंबई – पुणे जुन्या महामार्गावरील बोरघाटातून मुंबईच्या दिशेने शुक्रवारी सायंकाळी चालत्या कारला अचानकपणे आग लागली व या आगीत स्कोडा कार जळून खाक झाली. आग विझवण्यासाठी अग्निशामाक दल, अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी टीम, पोलीस यंत्रणा, देवदूत टीम अशा सर्वांनी शर्तीचे प्रयत्न केले.
परंतु, आगीची भीषणता पाहता या आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. त्यामुळे काही काळ या ठिकाणची वाहतूक थांबवण्यात आली होती. तसेच वाहन चालकाने सावधानता बाळगल्याने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली.