World Cup 2023 AUS vs AFG Live Score : विश्वचषक २०२३ च्या ३९व्या सामन्यात आज ऑस्ट्रेलियाचा सामना अफगाणिस्तानशी होत आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. पहिले काही सामने गमावल्यानंतर अफगाणिस्तानचा संघ जबरदस्त फॉर्मात आहे. त्यांनी गेल्या पाचपैकी चार सामने जिंकले आहेत. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाने पहिले दोन सामने गमावल्यानंतर सलग पाच सामने जिंकले आहेत. अशा स्थितीत उपांत्य फेरी गाठण्याच्या लढाईत दोघांमध्ये चुरशीची स्पर्धा होऊ शकते.
AUS vs AFG Live Score : अफगाणिस्तानच्या इब्राहिम झद्रानने 131 चेंडूत शतक झळकावले आहे. त्याचे वनडे कारकिर्दीतील हे पाचवे शतक होते. त्याच वेळी, इब्राहिम एकदिवसीय विश्वचषकात शतक झळकावणारा अफगाणिस्तानचा पहिला खेळाडू ठरला आहे.
43व्या षटकात 210 धावांवर अफगाणिस्तानला चौथा धक्का बसला. झम्पाने अजमतुल्ला ओमरझाईला मॅक्सवेलकरवी झेलबाद केले. 18 चेंडूत 22 धावा करून तो बाद झाला. 45 षटकांनंतर अफगाणिस्तानची धावसंख्या चार गड्यांच्या मोबदल्यात 227 धावा आहे.
अफगाणिस्तानने टाॅस जिंकला…
तत्पूर्वी, अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शाहिदीने प्लेइंग-11 मध्ये एक बदल केला आहे. फजलहक फारुकीच्या जागी नवीन उल हक खेळत आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने दोन बदल केले आहेत. ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल मार्शचे पुनरागमन झाले आहे. कॅमेरून ग्रीन आणि स्टीव्ह स्मिथ खेळत नाहीत. स्मिथला दुखापत झाली आहे.
AUS vs AFG : दोन्ही संघाचे playing 11 खालीलप्रमाणे…
ऑस्ट्रेलिया : ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड.
अफगाणिस्तान : रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झदरन, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल (विकेटकीपर), रशीद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, नवीन-उल-हक.