Black Mamba 735 Tractor । शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान काळ्या रंगाच्या ट्रॅक्टर ‘ब्लॅक मांबा 735’ची जोरदार चर्चा होत आहे. सध्या, ब्लॅक माम्बा ट्रॅक्टर सोशल मीडिया सध्या चांगलाच चर्चेत आला आहे, ब्लॅक माम्बा ट्रॅक्टर स्पोर्ट्स कारपेक्षा अधिक शक्तिशाली आहे. या ट्रॅक्टरच्या मालकाचे नाव बब्बर आहे, त्यांनी एका मुलाखतीदरम्यान या ट्रॅक्टरची खासियत सांगितली आणि ड्रोन हल्ला झाल्यानंतर ब्लॅक मांबा शेतकऱ्यांना कसा वाचवतो हे देखील त्यांनी सांगितले होते.
वृत्तवाहिनीशी बोलताना मोहालीचे रहिवासी बब्बर यांनी ‘ब्लॅक मांबा 735’ बद्दल माहिती दिली ते म्हणाले, ‘हा ट्रॅक्टर स्वराजचा आहे. यापैकी बहुतेक ट्रॅक्टरचे दोनच रंग आहेत, एकतर निळा किंवा लाल, पण माझा ट्रॅक्टर वेगळा असावा असे मला वाटले. डिस्कव्हरी चॅनल बघत असताना मला ही कल्पना सुचली.’
‘मग मला दक्षिण आफ्रिकेतील ब्लॅक माम्बा हा साप दिसला जो बाहेरून राखाडी आणि आतून काळा आहे, तो बघताच मला वाटले की माझा ट्रॅक्टर देखील त्याच डिझाइनचा असावा. जेव्हा कोणी माझा ट्रॅक्टर पाहतो तेव्हा तो बब्बरचा ट्रॅक्टर असल्याचे समजते.’ असेही त्याने संगीतले आहे.
‘ब्लॅक मांबा’ हल्ल्यापासून स्वतःचे संरक्षण कसे करते?
बब्बर यांनी सांगितले की, ‘मी हा ट्रॅक्टर पूर्णपणे अपडेट केला आहे. एवढेच नाही तर मनोरंजनासाठी त्यात म्युझिक सिस्टीमही बसवण्यात आली आहे. ब्लँक मांबा ट्रॅक्टरची रचना शेतातील कामासाठी करण्यात आली आहे, मात्र हा ट्रॅक्टर शेतकरी आंदोलनात आणण्याबाबत बब्बर म्हणाले की, ड्रोनमधून अश्रूधुराचे गोळे सोडल्यानंतर हा ट्रॅक्टर अतिशय प्रभावी ठरतो. कारण त्याच्या मागे एक पंखा बसवला आहे, जो हल्ला झाल्यानंतर 15 मिनिटांत सर्व धूर साफ करतो. इतकेच नाही तर हा धूर जिथून येतो त्या दिशेने तो परत फेकतो.’
ट्रॅक्टरमध्ये लोखंडी कवचही बसवलेले असते, जे आपल्याला हल्ल्यापासून वाचवते. एवढेच नाही तर हे ढाल इतके मजबूत आहे की समोरून येणारी एक गोळीही थांबेल. ब्लॅक माम्बाच्या किमतीबाबत बब्बर म्हणाले की, या ट्रॅक्टरची किंमत खूपच कमी आहे. हा ट्रॅक्टर किमान अडीच ते तीन लाख रुपयांमध्ये तो पूर्णपणे तयार होईल.
आफ्रिकेच्या घनदाट जंगलात ब्लॅक मांबा साप आढळतो. ब्लॅक मांबा हिरवा आणि राखाडी रंगाचा असतो. हा साप इतका धोकादायक आहे की, त्याचे फक्त एक मिलीग्रॅम विष माणसाला मारण्यासाठी पुरेसे आहे.हा असा साप आहे ज्याला चावलेला माणूस पाणीही विचारत नाही.’ यावर हे नाव ठेवण्यात आले आहे.
हेही वाचा
Janhvi Kapoor | जान्हवी कपूर ज्युनिअर एनटीआरनंतर आणखी एका साऊथ अभिनेत्यासोबत झळकणार