उन्नाव प्रकरणी ‘त्या’ आमदारावर भाजपची कडक कारवाई

लखनऊ – उत्तरप्रदेशातील उन्नाव येथील बलात्कार पीडित युवतीचा रायबरेली जवळ संशयास्पद अपघात झाला आहे. या घटनेमागे भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगर यांचा हात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मुद्द्यावरून संसदेतही राजकारण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर कुलदीप सिंह सेंगर यांना भाजपतून निलंबित करण्यात आले आहे.

उत्तरप्रदेशचे भाजप अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह म्हणाले कि, कुलदीप सिंह सेंगर यांच्यावर पक्षाने कडक कारवाई केली असून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. आता भाजप आणि कुलदीप सिंह सेंगर यांचा काही संबंध नसून प्रशासनाने आपली कारवाई करावी. उत्तरप्रदेश सरकार पीडितेच्या कुटुंबासमवेत आहे.

दरम्यान, उत्तरप्रदेशातील उन्नाव येथील बलात्कार पीडित युवतीचा काल रायबरेली जवळ संशयास्पद अपघात झाला आहे. या घटनेत सदर युवती गंभीर जखमी झाली असून तिच्या दोन महिला नातेवाईक ठार झाल्या आहेत. पीडितेच्या नातेवाईकांच्या मागणीनुसार उत्तरप्रदेश पोलिसांनी  कुलदीप सिंह सेंगर यांच्या समवेत अन्य लोकांवर गुन्हा दाखल केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.