जामखेड (प्रतिनिधी) : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना झालेल्या अटकेच्या निषेधार्थ जामखेड(जिल्हा अहमदनगर) तालुका युवा मोर्चाच्या वतीने खर्डा चौकात रास्तारोको करीत निषेध व्यक्त करत आला. तसेच जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांना निवेदन देऊन अटक तात्काळ मागे घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, दि. 23 रोजी महाड येथील पत्रकार परिषदेत बोलताना राज्याचे मुख्यमंत्री यांनी 15 ऑगस्ट रोजी आपले विचार मांडत असताना जी चूक केली त्या चुकीच्या वक्तव्याचा निषेध व चूक दाखवून देत असताना मंत्री राणे यांनी जे वक्तव्य केले त्याचा विपर्यास करत सरकारच्या वतीने त्यांच्यावर खोटे गुन्हे करून अटक करण्यात आली आहे.
तरी या अटकेचा खर्डा चौकात नगर बीड महामार्गवर रास्तारोको करीत निषेध व्यक्त करत त्यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
सदर निवेदन देताना युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले, भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशीद, रवी सुरवसे, मनोज कुलकर्णी, संजय कार्ले, वैभव कार्ले, सादिक बागवान, पांडुरंग उबाळे, प्रवीण बोलभट, सोमनाथ राळेभात, शिवकुमार डोंगरे, मोहन गडदे , मोहन देवकाते, बाळासाहेब गायकवाड, विकी घायतडक, प्रविण होळकर, अर्जुन म्हेत्रे, पप्पु काशिद, चंदु कार्ले उपस्थित होते.