मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली आहे. राणे यांना अखेर रत्नागिरी पोलिसांनी ताब्यात घेतलं. भाजपच्या वतीने काढण्यात आलेल्या जन आशीर्वाद यात्रेच्या मध्यातच अटक झाल्याने या यात्रेचं नेतृत्व बदलण्यात आलं आहे.
भाजपच्या वतीने मंत्रीमंडळात सामील करण्यात आलेल्या केंद्रीयमंत्र्यांना घेऊन देशभरात जन आशीर्वाद यात्रा काढण्यात येत आहे. महाराष्ट्रातील कोकणात राणे यांच्या नेतृत्वात यात्रा काढण्यात आली होती. मात्र राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर आता महाराष्ट्र भाजपने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याकडे या यात्रेची जबाबदारी सोपवली आहे.
नारायण राणे यांच्या गैरहजेरीत जन आशीर्वाद यात्रा प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वात काढण्यात येणार आहे. या संदर्भात महाराष्ट्र भाजपने निर्णय घेतल्याचं समजत.