तळेगाव दाभाडे – भारतीय जनता पार्टीच्या मावळ तालुका जम्बो कार्यकारणीची निवड जाहीर करण्यात आली. तळेगाव दाभाडे येथील हॉटेल ईशा हॉलमध्ये शुक्रवारी (दि. 17) बैठकीत निवड जाहीर करण्यात आली.
या वेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, भाजप मावळ तालुकाध्यक्ष रवींद्र आप्पा भेगडे, बाळासाहेब नेवाळे, युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे, प्रशांत ढोरे, माजी सभापती राजाराम शिंदे, ज्ञानेश्वर दळवी, एकनाथ टिळे, शिवाजी टाकवे, गुलाबराव म्हाळसकर, शांताराम कदम, गणेश गायकवाड, बाळासाहेब जाधव, सुनील चव्हाण आदी मान्यावर उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टी मावळ तालुका यांची नूतन कार्यकारणी बैठक तळेगाव दाभाडे येथे तालुका अध्यक्ष रवींद्र भेगडे यांच्या अध्यक्षखाली झाली.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :
मावळ तालुकाध्यक्षपदी रवींद्र भेगडे, संघटनमंत्री पदी किरण राक्षे (सांगावडे), सरचिटणीस पदी सुनील चव्हाण (इंदोरी), विश्वनाथ जाधव (महागाव) व कृष्णा घिसरे (देवले), उपाध्यक्षपदी गोविंद बोडके (गहुंजे), बाळासाहेब गाडे (सुदुंबरे), रमेश गायकवाड (चांदखेड), निवृत्ती वाडेकर (वाहणगाव), हिरामण सोरटे (दारुंब्रे), शशिकांत गाडे (कुसगाव), मच्छिंद्र केदारी (ताजे), संभाजी शिंदे (अहिरवडे), शत्रुघ्न धनवे (शिळींब), मारुती काटकर (पारवडी) व नामदेव भसे (नाणे).
चिटणीसपदी दिलीप शिंदे (ओव्हाळे), नवनाथ कडू (बोरज), दत्ता कोंडभर (शिळाटणे), शेखर वाघमारे (मुंढावरे), मारुती लोहकरे (दिवड), संतोष ठुले (मळवंडी), नितीन गाऊडसे (मोरवे), शशिकांत ठाकर (थोरण), रोहिदास धामणकर (उर्से), दिलीप गावडे (साते), गोपाल पिंगळे (डाहुली), रामदास लालगुडे (नवलाख उंब्रे), अनंत घारे (येलघोल) व मुरली कुटे (सोमवडी) आदींची निवड करण्यात आली.
पंचायत समितीच्या गण अध्यक्षपदी निवड पुढीलप्रमाणे : टाकवे बुद्रुक – अमोल भोईरकर, वडेश्वर – अरुण कुटे, महागाव – नारायण बोडके, चांदखेड – सूर्यकांत सोरटे, इंदोरी – संजय पवार, सोमाटणे – गुलाबराव घारे, वडगाव – सागर आगळमे, कामशेत – वसंत काळे, कुसगाव – शेखर दळवी, वाकसाई – सचिन येवले आदींची निवड करण्यात आली.
आंदर मावळ अध्यक्षपदी कल्हाट येथील गणेश कल्हाटकर, पवन मावळ अध्यक्षपदी शिवणे येथील धनंजय टिळे व नाणे मावळ अध्यक्षपदी वाकसाई येथील अमोल केदारी आदींची निवड करण्यात आली आहे.
पुणे जिल्हा परिषद गट अध्यक्षपदी निवड : टाकवे बुद्रुक – वडेश्वर : रोहिदास आसवले, इंदोरी-सोमाटणे : अविनाश गराडे, वडगाव-खडकाळा : राजेंद्र सातकर, कुसगाव-वरसोली : राजेंद्र शिंदे व महागाव-चांदखेड : ज्ञानेश्वर आडकर आदींची निवड करण्यात आली.