BJP’s manifesto | Congress – भारतीय जनतापक्षाने आज प्रसिद्ध केलेला जाहीरनामा म्हणजे केवळ आणखी एक जुमला पत्र आहे अशी टीका कॉंग्रेसने केली आहे. यात ना बेरेाजगारीचा मुद्दा आहे, ना शेतकऱ्यांना एमएसपीच्या कायदेशीर हमीचा मुद्दा आहे, ना त्यात महागाई नियंत्रणाची कोणती ग्वाही आहे.
भाजपच्या मागच्या जाहीरनाम्यातील सगळ्याच हमी आजही अपुर्ण आहेत त्यामुळे लोकांची फसवणूक करण्यासाठी भाजपने आज आणखी एक जुमला पत्र लोकांपुढे सादर केले आहे अशी टीका कॉंग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा, सुप्रिया श्री नेत यांनी आज पत्रकार परिषदेत केली. । BJP’s manifesto | Congress
पंतप्रधान नरेंद्र मेादी यांनी या आधीच्या निवडणुकांमध्ये दर वर्षी देान कोटी नोकऱ्या देण्याचे तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. सन २०२२ पर्यंत सर्वांना घरे देण्याचेही आश्वासन त्यांनी दिले होते.
महागाईवर नियंत्रण आणण्याची ग्वाहीही त्यांनी दिली होती पण त्यातील एकही हमी आजवर पुर्ण झालेली नाही. आज ते सन २०३६ मध्ये ऑलिम्पीक भारतात भरवू म्हणत आहेत. पण मोदी तो पर्यंत सत्तेवर असतील काय?
लोकांना सन २०४७ पर्यंत देश विकसित करण्याचीही गॅरंटी ते देत आहेत. पण त्यावेळी ते सत्तेवरच नसतीलतर इतक्या मोठ्या कालावधीची आश्वासने आत्ता देऊन उपयोग काय असा सवाल कॉंग्रेस प्रवक्त्यांनी केला. । BJP’s manifesto | Congress
मागच्या जाहीरनाम्यातील किती आश्वासने तुम्ही पुर्ण केली आणि पुढील पाच वर्षात तुम्ही काय करणार आहात यावर त्यांनी लक्ष केंद्रीत करणे अपेक्षित हेाते. पण ते भलत्याच गप्पा मारून लोकांची दिशाभुल करीत आहे असेही कॉंग्रेस प्रवक्त्यांनी म्हटले आहे.
एका संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करताना, काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा म्हणाले की, त्यांच्या २०१४ च्या जाहीरनाम्यात, मोदींनी विशेष टास्क फोर्स तयार करून विदेशातल काळा पैसा परत आणण्याचे आश्वासन दिले होते, परंतु त्याऐवजी त्यांनी निवडणूक रोखेआणले असा टोमणाही त्यांनी मारला.
विशेष पॅकेजच्या माध्यमातून १०० जिल्ह्यांतील गरिबी हटवली जाईल, असे आश्वासन मोदींनी दिले होते, परंतु भूक निर्देशांकाच्या आकडेवारीवरून सत्य समोर आले आहे, असा आरोपही खेरा यांनी केला.
भाजपने १०० नवीन स्मार्ट शहरे बांधण्याचे आश्वासन दिले होते परंतु ते कधीही बनवले गेले नाहीत आणि त्याऐवजी चीन सीमेवर भारतीय हद्दीत “स्मार्ट गावे” बांधत आहे, असे काँग्रेस प्रवक्त्यांनी नमूद केले. । BJP’s manifesto | Congress