लोणावळा शहर भाजपाची जम्बो कार्यकारिणी जाहीर

लोणावळा – भारतीय जनता पक्षाचा 39 वा वर्धापन दिन व विजय निर्धार मेळावा लोणावळा शहरात मोठ्या दिमाखात संपन्न झाला. गुढी पाडव्याचे औचित्य साधून आयोजित या मेळाव्यात नवनिर्वाचित शहराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी भाजप लोणावळा शहर कार्यकारिणीची घोषणा केली.

नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उपनगराध्यक्ष आणि शहराध्यक्ष श्रीधर पुजारी यांच्या अध्यक्षतेखाली भांगरवाडी येथील सुमित्रा सभागृह पार पडलेल्या या मेळाव्याला विद्यमान नगरसेवकांसह पक्षाच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांसोबत मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी लोणावळा शहराच्या विविध विभागातून जवळपास 125 पुरुष-महिला कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. यामध्ये एका माजी नगरसेवकाचा समावेश आहे. या कार्यक्रमात शहराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी आपली जम्बो कार्यकारणी जाहीर केली.

लोणावळा मंडल अध्यक्ष : श्रीधर सोमाप्पा पुजारी, सरचिटणीस : समीर इंगळे, संघटन मंत्री : राजाभाऊ खळदकर, उपाध्यक्ष : सचिन पत्की, अनिल खिल्लारे, कमलेश सेंगर, अनिष गणात्रा, मंगेश कचरे, राजू परदेशी, देवा दाभाडे, राजेंद्र शर्मा, संतोष गुप्ता, अप्पा देशमुख, प्रदीप थत्ते, मोहन राव, खजिनदार : अनिल गायकवाड, प्रवक्‍ता : अरविंद कुलकर्णी, कोअर कमिटी निमंत्रक : विनय विद्वान्स, युवा मोर्चा अध्यक्ष : अजय सुरेश जाधव, कार्याध्यक्ष : आकाश मावकर, सरचिटणीस : धवल राजेंद्र चौहान, महिला आघाडी अध्यक्ष : योगिता भरत कोकरे.

या सर्व प्रमुख आघाड्यांसह व्यापारी आघाडी, युवती आघाडी, कला व क्रीडा आघाडी, सोशल मीडिया, अल्पसंख्याक आघाडी, कामगार आघाडी, सहकार आघाडी, वाहतूक आघाडी, ओबीसी आघाडी, कायदा आघाडी, अनुसूचित जाती व जमाती या आघाड्यांच्या अध्यक्षांची तसेच पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.