भाजपाचे 2024 मध्ये अधिक जागा मिळविण्याचे लक्ष्य

नवी दिल्ली: 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 303 जागा मिळवत बहुमत मिळवले आहे. त्याआधी 2014 मध्ये भाजपला 282 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे आता 2024 ला यंदापेक्षा जास्त जागा मिळविण्याचे लक्ष्य भाजपने ठेवले असल्याची माहिती भाजपचे नेते सुनील देवधर यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीतील यशानंतर आता भाजप 2024 च्या लोकसभेच्या तयारीला लागले आहे. पुढील लोकसभा निवडणुकीत भाजपचे टार्गेट 333 जागा मिळविण्याचे असणार आहे. हिंदी भाषिकांचा पक्ष अशी आजही भाजपची प्रतीमा आहे. त्या प्रतिमेतून जर पक्ष बाहेर आला तरच आम्ही आमच्या 333 जागांच्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकतो. पश्‍चिम बंगालमध्ये प्रचारासाठी आता मी तेथील मुख्य भाषा शिकू लागलो आहे. जर तुम्हाला लोकांचे मन जिंकायचे असेल तर तेथील भाषा आलीच पाहिजे, असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)