सासवड -पुरंदर तालुक्यातील करोना रुग्णांची पॉझिटिव्ह येण्याचा वेग मागील दोन दिवसात मंदावला आहे. (दि.1) सकाळी सर्व अहवाल निगेटिव्ह आले होते. मात्र, काही वेळातच आलेल्या माहितीनुसार सासवडमधील दोन रुग्णांचे खासगी अहवाल पॉझिटिव्ह आले होते.
सासवड ग्रामीण रुग्णालयतर्फे पाठविण्यात आलेल्या ग्रामीण भागातील 34 अहवाल प्राप्त झाले होते. ते सर्व अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी दिली.
आता सासवडमधील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 255 इतकी झाली आहे. पुरंदर तालुक्यातील रुग्णांची संख्या 536 इतकी झाली असून मृत्यूची संख्या 25 वर पोहोचली आहे. सध्या बाधितांचा वेग मंदावल्याने तालुक्याला दिलासा मिळाला आहे.