नवी दिल्ली – गुजरात विधानसभा निवडणुकीत आपल्याला जोरदार यश मिळेल असा दावा आम आदमी पक्षाने केला आहे. त्याचप्रमाणे गेल्या सुमारे तीन दशकांपासून राज्यात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षांनीही गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपला प्रचंड बहुमत मिळेल असे म्हटले आहे.
Gujarat Election: ‘आप’ गुजरातमध्ये 95 जागा जिंकेल; अरविंद केजरीवाल यांचा विश्वास https://t.co/AD5GAyu8O9
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) November 3, 2022
आयोगाने निवडणूक कार्यक्रम घोषित केल्यानंतर भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही एक ट्विट केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला मोठा विजय मिळेल असे त्यांनी म्हटले आहे. गुजरातमध्ये पुन्हा एका भाजपचे डबल इंजिन सरकार येणार असून आगामी पाच वर्षांत समर्पण भावनेने हे सरकार काम करेल. जनतेच्या सर्व आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल.
Gujarat Election: निवडणुकीची घोषणा होताच पीएम मोदी लागले कामाला https://t.co/7Eo3praMz4
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) November 3, 2022