गहलोत सरकारविरोधात भाजप आणणार अविश्वास ठराव

जयपूर: राजस्थान विधानसभेचे सत्र 14 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. राजस्थान विधानसभेत भाजपने अशोक गहलोत सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडण्याचे जाहीर केले आहे. विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया यांनी ही घोषणा केली.

विधानसभा सत्राअगोदर सायंकाळी पाच वाजता अशोक गहलोत यांच्या शासकीय निवासस्थानी कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक घेतली जाईल. यामध्ये सचिन पायलट आणि त्यांच्या मतदारसंघाच्या आमदारांनाही विधिमंडळ पक्षाच्या बैठकीस आमंत्रित करण्यात आले आहे.

सचिन पायलट आणि अशोक गहलोत या बैठकीत भेट घेतील. केसी वेणुगोपाल यांच्या उपस्थितीत विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.