कोल्हापूर/प्रतिनिधी- ‘नागाळा पार्क प्रभागात विना टेंडर सुरू केले गेलेले तीस लाख रुपयांच्या कामातील दोषींवर रितसर मागणी करूनही कारवाईस टाळाटाळ करणाऱ्या महानगरपालिका प्रशासनाचा निषेधार्थ भारतीय जनता पक्ष आणि ताराराणी आघाडीने धरणे आंदोलन केले.
बेकादेशीरक कामाला आणि टक्केवारीला प्रशासन घालत असल्याचा आरोप केला. ‘भ्रष्टाचाराला पाठीशी घालणाऱ्या महानगरपालिका प्रशासनाचा धिक्कार असो’, ’भारतीय जनता पार्टीचा विजय असो’ अशा घोषणा दिल्या.
भाजपचे माजी नगरसेवक अजित ठाणेकर, विजय खाडे, चंद्रकांत घाटगे यांनी आोजित केलेल्या या आंदोलनात राहुल चिकोडे, महेश जाधाव, सुनील कदम, नाना कदम, किरण नकाते यांनी सहभाग घेतला. रस्ते प्रकल्प, कंटेनर, घंटा गाडी खरेदीतील भ्रष्टाचार, घरफाळा घोटाळा, नगररचना विभागातील भ्रष्टाचार, घनकचरा प्रकल्पातील काही माजी पदाधिकाऱ्याची भागीदारी, माजी महापौरांचा घरच्या कामासाठी मनपा निधी वापरण्याचा अयशस्वी प्रयत्न या विषयांचे वक्त्यांनी वाभाडे काढले.
प्रशासनाने दोषींवर त्वरित कारवाई केली नाही तर यापुढे आंदोलन आणखी तीव्र केले जाईल. अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरणे अवघड करू’ असा इशाराही दिला.यावेळी अशोक देसाई, हेमंत आराध्ये, भारत काळे, रविंद्र मुतगी, आप्पा लाड, विशाल शिराळकर यांनी प्रशासनावर टीका केली. आंदोलनात मंगला निपाणीकर, सुनीता सूर्यवंशी, सुजाता पाटील, सचिन तोडकर, दिलीप मैत्राणी, राजू मोरे, अजित सूर्यवंशी, प्रसाद मुजुमदार, विवेक कुलकर्णी, अतुल चव्हाण, महेश यादव, इकबाल हाकीम, प्रसाद नरुले, दिलीप बोंद्रे, सचिन मुधाळे, सचिन सुतार, प्रकाश घाटगे आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.