‘भाजप विरोधकांना घाबरतेय’

पुणे – भाजपला सत्तेचा कैफ चढला आहे. त्यामुळे विरोधकांना कसे रोखावे, हेच भाजपला समजेनासे झाले आहे. त्यामुळे भाजप विरोधकांना घाबरत असल्याची टीका कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार रमेश बागवे यांनी गुरूवारी येथे केले.

भाजप विरोधकांना घाबरत असल्यामुळे पंतप्रधानांच्या सुरक्षेचे कारण पुढे करत पुण्यातील सभेसाठी सोलापूरहून चार्टर्ड विमानाने निघण्याच्या तयारीत असलेले कॉंग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांना पुण्यास जाण्याची परवानगी नाकारण्यात आली. तसेच डॉ. अमोल कोल्हे यांना देखील हेलिकॉप्टरमधून पुण्यात येण्यास मज्जाव करण्यात आल्याचा आरोप बागवे यांनी केला.

बागवे यांच्या प्रचारार्थ वानवडी येथे आयोजित कोपरा सभेत ते बोलत होते. माजी आमदार मोहन जोशी, शरद सोनवणे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी खासदार रजनी पाटील, माजी महापौर प्रशांत जगताप, नगरसेवक अविनाश बागवे, नूतन शिवरकर, शिवाजी केदारी, संगीता तिवारी, विनोद मथुरावाला, सचिन तावरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

बागवे म्हणाले, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी हे कोणत्याही ठिकाणी सभेसाठी जात असत, तेव्हा आम्ही कोणा विरोधकांचे विमान रोखले नाही, ही कॉंग्रेसची संस्कृती आहे. विरोधकांचा सन्मान राखणे हे कॉंग्रेसने शिकवले. पण, भाजप सरकारने साम-दाम-दंड-भेद वापरून विरोध संपवण्याचे हीन राजकारण करत आहे. त्यामुळे भाजप सरळसरळ विरोधकांना घाबरल्याचे या प्रकारावरून समोर येत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. तसेच सुज्ञ मतदार भाजपला कधीच साथ देणार नाही, असा विश्‍वासही बागवे यांनी व्यक्त केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)