भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांची प्रकृती खालावली; मुंबईला हलवलं

मुंबई – भारतीय जनता पक्षाच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची प्रकृती अचानक खालावली आहे. त्यामुळे त्यांना तातडीने मुंबईला हलविण्यात आले आहे. प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या कार्यलयाने यासंदर्भात माहिती दिली आहे.


प्रज्ञा सिंह ठाकूर यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागली.  त्यानंतर त्यांना स्टेट प्लेनने तातडीने मुंबईला हलविण्यात आलं.  प्रज्ञा ठाकूर यांना मुंबईतील कोकीलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.  शनिवारी दुपारी त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवत होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.