जिंद: भाजप पक्षातील आमदार नेहमी त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. यातच पुन्हा एकदा भाजप आमदार त्यांचा वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आले आहे. जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीबद्दल टिप्पणी करताना, अधिकाऱ्यांची तुलना थेट दहशतवाद्यां -सोबत केल्यामुळे हरियाणातील जिंदमधील भाजप आमदार डॉ.कृष्ण मिध्दा चांगलेच चर्चेत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,’ पावसानंतर उद्धभवलेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी भाजप आमदार मिद्धा आपल्या मतदारसंघात आले होते. या पाहणीवेळी तेथील स्थानिकांनी त्यांना परिसरातील एक रस्ता पावसात वाहून गेल्याची माहिती दिली. त्यावर त्यांनी अधिकाऱ्याशी संवाद साधला असता. अधिकाऱ्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यावर त्यांनी नाराजी व्यक्त करत. अधिकाऱ्यांची तुलना थेट दहशतवाद्यां -सोबत केली.’
ते म्हणाले,’अधिकाऱ्यांपेक्षा दहशतवादी बरे. बॉम्बस्फोट करतात आणि त्याची जबाबदारी स्विकारतात. हे अधिकारी दहशतवाद्यांपेक्षाही गेलेले आहेत,’अशी टीका केली. त्यांचा या टीकेवर विरोधी पक्षाकडून भाजप पक्षावर निशाणा साधला आहे.