मुंबई – मुंबईतल्या मलबार हिल मतदार संघातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणारे मुंबई प्रदेश भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात जी माहिती सादर केली आहे त्यात त्यांनी आपली संपत्ती 441 कोटी रूपयांची असल्याचे नमूद केले आहे.
लोढा हे या मतदार संघातून पाच वेळा विधानसभेवर निवडून गेले असून त्यांनी आता सहाव्यांदा तेथून आपला अर्ज दाखल केला आहे. त्यांनी सादर केलेल्या माहितीनुसार त्यांची जंगम मालमत्ता 252 कोटींची असून स्थावर मालमत्ता 189 कोटी रूपयांची आहे.
तसेच त्यांनी आपल्यावर 283 कोटी रूपयांचे कर्ज असल्याचेही प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. लोढा कुटुंबिय बांधकाम व्यवसायात आहे. त्यांचे स्वताचे दक्षिण मुंबईत पाच मोठे फ्लॅट आहेत. तसेच त्यांचा राजस्थानात मोठा भुखंड आहे.त्यांच्या पत्नीच्या नावावरही वेगवेगळ्या मालमत्ता आहेत.