Uttar Pradesh BJP Leader Murder| उत्तर प्रदेशमधील जौनपूर येथे भाजपचे नेते प्रमोद यादव यांची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली आहे. भाजपच्या किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद यादव (55 वर्ष) अज्ञात हल्लेखोरांच्या गोळीबारात गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
ही घटना जौनपूरमधील बक्सा ठाणे क्षेत्रातील बोधापूर येथे घडली. या हल्लेखोरांनी त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या आणि घटनास्थळापासून काही अंतरावर दुचाकी सोडून पळ काढला. पोलिसांनी घटनास्थळावरून चोरट्याची दुचाकी ताब्यात घेतली असून तपास करत आहेत. Uttar Pradesh BJP Leader Murder|
भाजप नेत्याच्या हत्येची माहिती मिळताच पोलीस विभाग अलर्ट मोडवर आला आहे. प्रमोद यादव यांच्या हत्येप्रकरणी अद्याप कोणावरही आरोप करण्यात आलेले नाहीत. याप्रकरणी पोलिस नियमितपणे सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत आणि प्रत्यक्षदर्शींचा शोध घेत आहेत.
कोण आहेत प्रमोद यादव ? Uttar Pradesh BJP Leader Murder|
भाजपने २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत मल्हनी विधानसभा मतदारसंघातू प्रमोद यादव यांना उमेदवारी दिली होती. त्या निवडणुकीत समाजवादी पक्षाचे पशुपतीनाथ यादव विजयी झाले होते. तर धनंजय सिंह याची पत्नी जागृती सिंह ह्या दुसऱ्या स्थानी होत्या.
हेही वाचा:
Narendra Modi । ‘…तर २०२६ मध्ये हा देश कर्जात डुबलेला असेल’ या बड्या नेत्याचं भाकीत