भाजप आमदार किरण माहेश्वरी यांचं कोरोनामुळे निधन

नवी दिल्ली –  राजस्थानच्या राजसमंद मतदारसंघातील भाजपच्या ज्येष्ठ आमदार किरण माहेश्वरी यांचे रविवारी कोरोनामुळे निधन झाले आहे. हरियाणातील गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनामुळे निधन झालेल्या राजस्थानच्या त्या दुसऱ्या आमदार आहेत.यापूर्वी सहाडाचे काँग्रेसचे आमदार कैलाश त्रिवेदी यांचेही कोरोनामुळे निधन झाले होते.

किरण माहेश्वरी यांचा  28 आॅक्टोबर रोजी कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आला होता.  त्यानंतर 7 नोव्हेंबर रोजी त्यांना एयर अम्बुलन्सव्दारे उद्यपूर येथून हरियाणा येथील गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर तिथे उपचार सुरू होते.मात्र रविवारी (29 नोव्हेंबर) रात्री अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचे निधन झालं.

माहेश्वरी यांच्या अकाली निधनामुळे राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीपासून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आमदार किरण माहेश्वरी यांना ट्वीट करून श्रद्धांजली वाहिली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.