जम्मू – जम्मू-काश्मिरात नुकत्याच झालेल्या डीडीसी निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आचारसंहितेचा भंग केल्याच्या आरोपावरून 17 सरकारी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहेत. त्यात किश्तवार जिल्ह्यातील तीन पोलीस कर्मचारी आणि सात शिक्षकांचा समावेश आहे.
दरम्यान या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या मंगळवारी होणार आहे. त्यात निवडणूक आचारसंहितेवर कडक लक्ष ठेवले जाणार आहे. उद्या 43 मतदार ,संघांमध्ये मतदान होणार असून त्यात एकूण 321 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यातील 18 जागा जम्मू विभागातील आहेत तर 25 जागा काश्मीर विभागातील आहेत.
ज्या सरकारी कर्मचाऱ्यांवर आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप आहे त्यांची रितसर चौकशी करण्याचाहीं आदेश देण्यात आला आहे.