bjp । देशात लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. भाजपची लोकसभा निवडणुकीसाठी नवीन घोषणा ‘अबकी बार 400 पार, तीसरी बार मोदी सरकार सध्या चांगलीच चर्चेत आहे. या निडवणुकीत भाजप ४०० पेक्षा जास्त जागा घेणार असल्याच्या चर्चेवरून राज्यात भाजप पक्ष किती जागा जिंकणार असा प्रश्न सध्या सर्वांना पडला आहे.
राज्यात भाजपने शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्या सोबत महायुती केली. त्यात आता मनसे प्रमुख राज ठाकरे हे सुद्धा एकत्र येत लोकसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून भाजप पक्षाने आता पर्यंत ऐकून २ जाहीर केल्या आहे. तर अजित पवार गट आणि शिंदे गटाने आता पर्यंत उमेदवारी यादी जाहीर केलेली नाही.
तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रासह देशभरातील उमेदवारांची यादी जाहीर केली. येत्या निवडणुकीत महायुती जिंकणार की महाविकास आघाडी याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यात भाजप महाराष्ट्रात एकंदरीत किती जागा जिंकणार याकडेही सर्वांचे लक्ष आहे. अशात इंडिया टीव्ही- सीएनएक्सच्या ओपिनियन पोलमध्ये 48 मतदारसंघात नेमकं कोण जागा जिंकणार याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
India TV-CNX च्या ओपिनियन पोलनुसार, यंदाच्या निवणडुकीत राज्यात 48 पैकी 24 जागा या भाजपला मिळतील. मात्र, असं असलं तरीही मागील दोन्ही निवडणुकीत NDA ला जेवढ्या जागा जिंकता आल्या होत्या तेवढ्या मात्र जिंकता येणार नाही.
जाणून घेऊया ओपिनियन पोलनुसार, भाजप महाराष्ट्रातील कोणकोणत्या जागा जिंकणार?
मुंबई उत्तर – भाजप
मुंबई उत्तर पूर्व – भाजप
मुंबई उत्तर मध्य – भाजप
अकोला – भाजप
अमरावती – भाजप
वर्धा – भाजप
नंदूरबार -भाजप
धुळे – भाजप
जळगाव -भाजप
दिंडोरी -भाजप
नागपूर – भाजप
जालना – भाजप
लातूर – भाजप
बीड – भाजप
पालघर – भाजप
भंडारा-गोंदिया – भाजप
गडचिरोली चिमूर -भाजप
चंद्रपूर – भाजप
नांदेड – भाजप
भिवंडी – भाजप
पुणे – भाजप
अहमदनगर – भाजप
सोलापूर – भाजप
सांगली – भाजप