कोपरगाव – कोपरगाव शहर व तालुका भारतीय जनता पक्षाच्यावतीने मोहम्मद पैगंबर यांची जयंती भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर सार्वजनिकरित्या भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी करण्यात आली.
याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष दत्ता काले, अमृत संजीवनीचे अध्यक्ष पराग संधान, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, रवींद्र पाठक, अल्ताफ कुरेशी, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष खालील कुरेशी, फकिर मंहमद पहिलवान, दिव्यांग सेलचे मुख्तार पठाण, बरभाई शेख, नसीर शेख लेखक भाई शेख, रहीम शेख, पटाणे नामावसाई शेख, नसीर सय्यद, हाजी सद्दाम सय्यद, सय्यद हिम शेख, लियाकत सय्यद, इलियास खाटीक, फिरोज पठाण एस.पी. पठाण, अहमद बेकरीवाले, सलमान पठाण,
रविंद्र रोहमारे, सत्येन मुंदडा, सोमनाथ म्हस्के, अर्जुन मरसलेद, मधुकर रिळ, वैभव गिरमे, संदिप देवकर, विनोद राक्षे, बबलु वाणी, प्रसाद आढाव, अशोक लकारे, विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी भाजप कार्यकर्ते, मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिसरातील मशिदींना, तसेच घरोघरी रंगरंगोटी करण्यात आली येऊन घरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या वेळी न्याजचे (भंडारा) वाटप करण्यात आले.