मुंबई – करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत काँग्रेसचे नेते राजीव सातव यांचं निधन झाल्याने राज्यसभेची जागा रिक्त झाली आहे. राज्यसभेची ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी काँग्रेसने हालचाली सुरू केल्या असतानाच भाजपने राज्यसभेच्या उमेदवाराची घोषणा केली आहे. यावरून काँग्रेसने भाजपवर टीका केली आहे.
काँग्रेस नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपला प्रथा परंपरेची आठवणच करून दिली. त्यांनी भाजपचे नेते प्रमोद महाजन यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेबाबत घेण्यात आलेल्या निर्णयाची आठवणच करून दिली आहे.
प्रमोद प्रमोद महाजन यांचं अकाली निधन झाल्यानंतर राज्यसभेची निवडणूक लागली होती. मात्र, महाजन यांच्या जागी उमेदवार न देण्याचा काँग्रेसने निर्णय घेतला होता. एखाद्या नेत्याचं निधन झाल्यावर त्या जागी उमेदवार न देण्याची प्रथा आहे, असं सांगतानाच वेळ आल्यावर आम्ही भाजपला उमेदवार न देण्याबाबत विनंतीही करू, असं थोरात यांनी सांगितलं.
2006मध्ये प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर राज्यसभेची जागा रिक्त झाली होती. त्यावेळी भाजपच्या विनंतीवरून काँग्रेसने उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली होती.