विचित्र अपघात; अपघातग्रस्त गाड्या बाजूला करताना भरधाव ट्रकची जोराची धडक; अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

पनवेल : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत आहे. त्यातच आज पुन्हा एकदा एक्स्प्रेस वेवर झालेल्या विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर पनवेलच्या अष्टविनायक आणि एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुशांत मोहिते आणि प्रथमेश बहिरा अशी मृतांची नावं असून ते पनवेल इथले रहिवासी होते.

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर सोमवारी मध्यरात्री पनवेलजवळील कोन गावानजीक मर्सिडीज कार दुभाजकावर धडकल्याने अपघात झाला. याचवेळी मागून आलेली स्विफ्ट कार मर्सिडीजला धडकली. या अपघातानंतर दोन्ही कार बाजूला घेत असताना मागून आलेल्या भरधाव ट्रकने मर्सिडीज कारला जोरदार धडक दिली.

या विचित्र अपघातात मर्सिडीज कारमधील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. याशिवाय स्विफ्ट कारमधील एक जण जखमी झाला. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, या अपघातात स्विफ्ट कारचा चक्काचूर झाला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.