अभिनेता मिलिंद गुणाजीचे उजनीवर पक्षी निरीक्षण

सोलापुर: महाराष्ट्रातील गडकिल्ले, डोंगरदऱ्या, तीर्थ स्थाने व जलाशयांचे हवाई चित्रीकरण करण्यात हातखंडा असलेले प्रख्यात वन्यजीव छायाचित्रकार, तज्ज्ञ पर्यावरण साहित्यिक व अभिनेता मिलिंद गुणाजी यांनी उजनी पाणलोट क्षेत्रात पक्षीनिरीक्षण केले. गुणाजी यांनी स्थानिक पक्षी अभ्यासक डॉ. अरविंद कुंभार यांच्या मदतीने पक्षीनिरीक्षण करून चित्रीकरणाची मोहीम राबवली.

सूर्योदयापूर्वी पळसदेव परिसरात सुरु झालेली मोहीम डिकसळ व कोंढारचिंचोळी जवळच्या जुन्या रेल्वे पुलाजवळच्या परिसरात भटकंती करून संपली. गुणाजी हे एका खासगी कामानिमित्त सोलापुरात आले होते. ते मुंबईच्या परतीच्या प्रवासात भिगवणजवळच्या उजनी पाणलोट क्षेत्रातील पक्ष्यांचे छायाचित्रीकरण करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार ही मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेत शेकडो रोहित पक्षी व हजारोंच्या संख्येने मुग्धबलाक व चितबलाक हे करकोचे आढळले. निरीक्षणाच्या वेळी स्थलांतरित बदके परत गेल्याने त्यांच्या चित्रीकरणाची संधी हुकली. मात्र हळदीकुंकू या स्थानिक बदके मात्र गणनीय प्रमाणात आढळले. यावेळी राखी बगळे, पाणकावळे, शेकाट्या, पाणभिंगरी, तुतुवार नदीसुरय, पाणभिंगरी, कुदळ्या इत्यादी जलपक्ष्यांचे छायाचित्रे काढण्यात आले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)