राजस्थान पाठोपाठ मध्य प्रदेशात ‘बर्ड फ्ल्यू’चे सावट गडद

भोपाळ – मध्य प्रदेशच्या तीन जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात शेकडो कावळे मरून पडत असल्याने भीतीचे वातावरण आहे. या कावळ्यांचे शवविच्छेदन अहवालाची प्रतिक्षा आहे. त्यानंतरच त्यांना बर्ड फ्ल्यू झाला आहे की नाही हे समजू शकेल.

इंदूरमध्ये डाल्या महाविद्यालयाच्या परिसरात जवळपास दीडशे कावळे मरण पावले आहेत. त्यातील पाच नमुने भोपाळ येथील पशू आजार प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. त्याचे अहवाल प्रलंबीत आहेत. त्यानंतर हे मृत्यू बर्ड फ्ल्यूने झाले आहेत का? याची माहिती समजू शकेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मंदसौर या राजस्थान सीमेलगतच्या जिल्ह्यात सुमारे दोनशे कावळे मरून पडले आहेत. यातील बहुतांश कावळे हे मंदसौर न्यायलयाच्या आवारत मरण पावले. गेल्या दोन-तीन दिवसांपासून कावळे मरून पडत आहेत. त्याचे नमुनेही भोपाळला तपासण्यासाठी पाठवले आहेत. त्याचा अहवाल प्रलंबित आहेत.

मात्र जिल्हा प्रशासनाने आरोग्य विभाग, पशू संवर्धन विभाग आणि महापालिकेला आवश्‍यक उपाय योजना करण्याचे आदेश दिले आहेत. आवश्‍यक तेथे निर्जंतुकीकरण करण्यास सांगितले आहे.
खारगावच्या कासरवाड भागात 20 कावळे मरून पडले.

तेथे खबरदारीच्या उपाय योजना राबवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. “कावळे मरत असल्याचे मला समजले. काही कावळे मेलेल्या अवस्थेत आढळले. आम्ही त्यांचे नमुने तपासणीसाठी भोपाळला पाठवले आहेत. त्यांना बर्ड फ्ल्यू झाला आहे की नाही हे अद्याप समजले नाही मात्र ही बाब अत्यंत गंभीर असल्याने आम्ही अत्यंत सतर्कता बाळगत आहोत, असे डॉ. ललित पाटीदार यांनी सांगितले.

कासरवाडच्या जंगलेश्‍वर महादेव मंदिराच्या परिसरात कावळे झाडावरून मरून खाली पडत आहेत. गेल्या तीन द्‌दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. सामजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक पशू संवर्धन विभागाला मृत पक्षी शोधण्यासाठी मदत करत आहेत.

इंदूरमध्ये डाल्या कॉलेज परिसरापासून एक किमी त्रिज्येच्या परिसरात दारोदार सर्वेक्षण करत आहेत. त्यात बर्ड फ्ल्यूची लक्षणे असणअरा कोणीही सापडले नाही. मात्र 10 जणांना सर्दी आणि ताप आहे. येतील प्राणी संग्रहालात आवश्‍यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे,

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.