बिपाशा बासू आणि तिचा नवरा करण सिंह ग्रोवर या जोडीनेही आता माता-पित्याचा रोल स्वीकारायचा ठरवले आहे. मात्र बिपाशाकडे सध्या गुड न्यूज नाही. या जोडीने एक मूल दत्तक घ्यायचे ठरवले आहे.
करण सिंह ग्रोवरनेही याच अर्थाचे सूतोवाच केले आहे. विवाहानंतर बिपाशानंतर सिनेमातून ब्रेक घेतला आहे. लग्नानंतर ती कोणत्याही सिने ऍवॉर्डच्या पार्टीमध्येही हजर झालेली नाही.
बिपाशा आणि करण सिंह ग्रोवर 6 वर्षांपूर्वी अलोनमध्ये दिसले होते. 2016 च्या सुरुवातीलाच त्यांनी लग्न केले. त्यानंतर बिपाशा आपल्या फॅमिली लाईफमध्ये खूपच बिझी झाली. आता लग्नाच्या 5 वर्षांनंतर बिपाशा डेंजरस या वेबसिरीजमधून पुनरागमन करते आहे.
ही वेबसिरीज देखील ती नवरा करण सिंह ग्रोवर बरोबर करते आहे. याच वेबसिरीजच्या प्रमोशनच्या इंटरव्ह्यूमध्ये तिने ऍडॉप्शनच्या पर्यायाबद्दल सांगितले. जर स्वतःचे मूल झाले नाही. तरी काही हरकत नाही. देशामध्ये अनेक मुले आहेत. त्यांचे पालन पोषण पण आम्ही करू शकतो.
असे ती म्हणाली. ज्या अर्थी दोघांनी मूल दत्तक घेण्याचा इतका विचार केला आहे, त्या अर्थी त्यांचा निर्णय पक्का झालेला असणार. लवकरच त्यांनी एखादे मूल दत्तक घेतल्याची बातमीही आपल्याला समजले.