करोनामुळे बॉलीवूडमधील अनेक सिनेमे थिएटरवर रिलीज होण्याची वाट बघत आहेत. 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्यावरील बायोपिकही यामध्येच एक आहे. मेजर संदीप उन्नीकृष्णन हे नॅशनल सिक्युरिटी गार्डमधील मेजर होते.
26/11 च्या हल्ल्यादरम्यान दहशतवाद्यांबरोबर लढताना ते शहीद झाले होते. त्यांच्यावरील बायोपिक 2 जुलैला थिएटरमध्ये रिलीज केला जाणार होता. मात्र, तो सध्या स्थगित करण्यात आला आहे.
परिस्थिती जर अवघड असेल, तर आम्हीदेखील त्याला तोंड देण्यासाठी मजबूत आहोत, असे ती म्हणाली. थिएटर रिलीज पुढे ढकलावा लागल्याने नाईलाजाने या सिनेमाला ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केले जाऊ नये, अशी इच्छा अनेक फॅन्सनी व्यक्त केली आहे.
शोभिता धुलिपाला आणि सई मांजरेकर त्यात लीड रोल करणार आहेत. मात्र, मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या मुख्य रोलमध्ये कोण दिसणार आहे, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. नवीन रिलीज डेटचे पोस्टर रिलीज झाल्यावर हिरोचे नावही समजेल.