सलमानच्या “राधे’बद्दल इंटरनेटवर खूप रिव्ह्यू प्रसिद्ध झाले आहेत. मात्र, स्वयंघोषित विश्लेषक कमाल आर. खानने “राधे”चा निगेटिव्ह रिपोर्ट दिला आहे. त्यावरून संतापलेल्या सलमान खानने कमाल आर. खानला चक्क कायदेशीर नोटीस बजावली आहे.
या नोटिसीवर उद्या म्हणजे गुरुवारी मुंबईतल्या कोर्टात सुनावणी होणार आहे. पण कमाल खान सध्या दुबईमध्ये आहे. त्याने या नोटिसीबद्दलची आपली प्रतिक्रिया दिली आहे. तांत्रिकदृष्ट्या ही नोटीस नाही, तर पूर्वसूचना आहे.
ही नोटीस तब्बल 250 पानांची आहे. त्यामुळे त्यात काय म्हटले आहे, हे तरी वाचायला पाहिजे, असे कमाल खान म्हणाला. आपल्या रिव्हूमध्ये जे आपल्याला वाटले, तेच लिहिले असल्याचेही त्याने सांगितले. “राधे’मध्ये सलमान आणि दिशा पटणीची जोडी अगदी अयोग्य दिसते आहे. दिशा सलमानपुढे अगदी लहान मुलगी वाटते. सलमान 55-57 वर्षांचा आहे.
पण तो अजूनही स्वतःला 20-22 वर्षांचा समजतो आहे. साऊथमध्ये रजनीकांत, कमल हासन, चिंरजीवी अजून तरुण रोल करतात. पण मी तर ते सिनेमे बघतही नाही. सलमान स्टार आहे. त्याच्या सिनेमावर शेकडो जणांचे घर चालते. पण जर सलमान नसेल तर त्याच्या जागेवर अन्य कोणी स्टार येऊ शकतो, असेही कमाल खान म्हणाला.