मुंबई – अभिनेत्री कंगनाचा शो ‘लॉकअप’ फेम मॉडेल आणि सोशल मीडिया स्टार अंजली अरोराचा तिचा वाढदिवस आहे. यानिमित्त तिचे व्हिडीओज आणि फोटोज सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. अंजली अरोराचा जन्म ३ नोव्हेंबर १९९९ रोजी एका पंजाबी कुटुंबात झाला. आज ती तिचा 23 वा वाढदिवस साजरा करत आहे. अंजली अरोरा हिने अनेक हिंदी आणि पंजाबी म्युझिक व्हिडिओमध्ये काम करून प्रसिद्धी मिळवली आहे. परंतु काचा बदाम या एका रिलने तिला सर्वाधिक फेम दिल. अंजली काल रात्री मुंबईत तिच्या वाढदिवसाच्या पार्टीत मित्रांसोबत दिसून आली.
जलीच्या पार्टीत सर्वजण मस्ती करताना दिसले. बर्थडे गर्ल देखील यावेळी रेड गाऊनमधे एकदम हॉट दिसत होती. अंजली अरोरा तिचा वाढदिवस मित्रांसोबत साजरा करण्यासाठी एक दिवस आधीच मुंबईत पोहोचली होती. यानंतर तिने काल रात्री तिच्या सर्व मित्रांना प्री बर्थडे पार्टीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी अंजलीने खूप धमाल केल्याचे दिसून आले. अंजलीच्या जन्मदिवसानिमित्त तिची मैत्रीण उर्फी जावेदसह अनेक सेलिब्रेटी उपस्थित होत्या.
View this post on Instagram
बर्थडे गर्लच्या लूकबद्दल सांगायचे तर अंजली अरोराने लाल थाई स्लिट गाऊन घातला होता. हा लूक तिने बन आणि परफेक्ट मेकअपने पूर्ण केला. 23 वर्षांची अंजली अरोरा पार्टीमध्ये खूपच सुंदर दिसत होती. सोशल मीडिया यूजर्सही अंजलीच्या या लूकचे दिवाने झाल्याचे दिसून आले.