नवीदिल्ली – बिहारमध्ये, सर्वेलन्स इन्व्हेस्टिगेशन ब्युरोचे पथक पाटणा आणि किशनगंजमधील कार्यकारी अभियंता संजय कुमार रॉय यांच्या घरांवर छापे टाकत आहे. या छाप्यात सुमारे पाच कोटी रुपयांची रोकड समोर आली आहे. मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्यानंतर नोटा मोजण्यासाठी मशीन मागवावी लागली असल्याचे देखील समोर आले. यावेळी अनेक महत्त्वाची कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. संजय कुमार रॉय यांच्यावर सरकारी नोकरीत राहून अवैधपणे काळा पैसा कमावल्याचा आरोप आहे.
यावेळी अभियंता संजय कुमारच्या घरातून पाच कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. यापैकी किशनगंज येथील निवासस्थानातून सुमारे चार कोटी रुपये आणि पाटणा येथील निवासस्थानातून एक कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. संजय कुमार राय ग्रामीण बांधकाम विभागाच्या किशनगंज विभागात कार्यरत आहेत. यासोबतच मोठ्या प्रमाणात दागिने जप्त केल्याचीही चर्चा आहे. जमीन आणि घराची कागदपत्रे मिळण्याची बाबही समोर येत आहे.
#WATCH | Bihar: Cash counting is underway at the residence of Sanjay Kumar Rai, Executive Engineer of the Kishanganj Division of Rural Works Department in Patna.
Vigilance department has conducted raids at 3-4 premises of Sanjay Kumar Rai in Bihar pic.twitter.com/RwW04tNs4I
— ANI (@ANI) August 27, 2022
शनिवारी सकाळी नियंत्रण पथक रुईधसा येथील ग्रामीण बांधकाम विभागाचे कार्यालय, लाईन मोहल्ला येथील कार्यकारी अभियंता यांचे निवासस्थान तसेच इतर अनेक ठिकाणी छापे टाकले. यासोबतच विभागाचे कॅशीयर खुर्रम सुलतान यांच्या घरावरही छापे टाकण्यात येत आहेत. छापेमारी पूर्ण झाल्यानंतरच ऐकून किती संपत्ती आणि मालमत्ता सापडली त्याबाबतची माहिती दिली जाणार आहे.