स्मृती इराणींसाठी वाजल्या सर्वाधिक काळ टाळ्या

लोकसभेतील सदस्यत्वासाठी आज झालेल्या शपथविधी कार्यक्रमात अमेठी मतदार संघातल्या खासदार स्मृती इराणी यांना सदस्यांनी जोरदार टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. त्यांच्यासाठीच सर्वाधिक काळ सदस्यांनी टाळ्या वाजवल्या. शपथविधीसाठी त्यांचे नाव पुकारले जाताच सर्व सदस्यांनी त्यांचे बाके व टाळ्या वाजवून जोरदार अभिंनदन केले. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथसिंह, यांनीही त्यांच्या सन्मानार्थ बाके वाजवून आनंद व्यक्त केला. त्यांनी हिंदीतून शपथ घेतली.

त्यानंतर त्यांनी युपीए अध्यक्षा सोनिया गांधी आणि अन्य विरोधी सदस्यांनाही त्यांच्या जागेवर जाऊन अभिवादन केले. यावेळी त्यांचे अमेठीतील विरोधक राहुल गांधी हे सभागृहात उपस्थित नव्हते. त्यांनी अमेठीतील प्रतिष्ठेच्या लढतीत राहुल गांधी यांचा 55 हजार मतांनी पराभव केला आहे. हा गांधी परिवाराचा प्रभाव असलेला मतदार संघ आहे. अमेठीत गेल्यावेळीही स्मृती इराणी यांनी राहुल गांधींशी लढत दिली होती पण त्यावेळी त्यांचा मोठा पराभव झाला होता. पण त्यानंतरही त्यांनी सातत्याने अमेठीतील लोकांशी संपर्क ठेवला त्याचा त्यांना या निवडणुकीत लाभ झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.