भाजपचे विरेंद्रकुमार बनले लोकसभेचे हंगामी सभापती

नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ लोकसभा सदस्य विरेंद्रकुमार यांची आज लोकसभेच्या हंगामी सभापतीपदी निवड करण्यात आली. त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सभापतीपदाची शपथ दिली. लोकसभेत आता त्यांच्याच अध्यक्षतेखाली दोन दिवस निवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी चालणार आहे. विरेंद्रकुमार हे मध्यप्रदेशातील टिकमगडचे खासदार आहेत आणि ते तब्बल सात वेळा लोकसभेवर निवडून आले आहेत. ते मागच्या मोदी सरकार मध्ये राज्यमंत्रीही होते.

लोकसभेच्या अधिवेशनाला आजपासून नव्या उत्साहात प्रारंभ झाला. पहिले दोन दिवस हे फक्त नवीन सदस्यांच्या शपथविधीतच जाणार आहेत. या शपथविधीसाठी हंगामी सभापती म्हणून या आधी मनेकां गांधी यांचे नाव चर्चीले गेले होते. पण त्यांच्या ऐवजी ही संधी विरेंद्रकुमार यांना मिळाली आहे. नवीन सदस्यांचा शपथविधी झाल्यानंतर नियमीत अध्यक्ष निवडला जाणार आहे. त्यावेळी मनेका गांधी यांना ही संधी मिळू शकते असे सांगण्यात येते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here