मुंबई – जगासह देशातही करोना विषाणूचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतच आहे. या विषाणूचा परिणाम सर्वसामान्य माणसापासून देशाच्या अर्थव्यवस्थेवरही दिर्घ काळ जाणवणार असल्याचे सद्य परिस्थितीवरून दिसून येत आहे. त्यात कोरोनाची लागण काही कलाकारांना झाल्याचंही समोर आले आहे.
यातच मिळालेल्या माहितीनुसार, कलर्स मराठीवर लागणाऱ्या रिऍलिटी शो बिग बॉस मराठी फेम अनिल थत्ते यांना कोरोनाची लागण झाली आहे. अनिल थत्ते यांनी याबाबत सोशल मीडियावर व्हिडियो शेअर करत माहिती दिली आहे.