मुंबई – बॉलिवूडच्या पॉवरफुल जोडीमध्ये दुरावा निर्माण झाल्याची चर्चा सध्या सोशल चांगली रंगली आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्यात काहीही चांगले चालले नाही. अशा चर्चा सध्या सोशलवर रंगल्या आहे.
एका व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये कार्यक्रमादरम्यान दोघांमधील अंतर पाहून चाहते अंदाज बांधत आहेत.दीपिका आणि रणवीर इंडियन स्पोर्ट्स ऑनर इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी आले होते. जिथे दीपिकाने रणवीरकडे खूप दुर्लक्ष केले. दीपिका तिचे वडील प्रकाश पदुकोणसोबत दिसली. रणवीरने दीपिकाचा हात धरण्याचा प्रयत्न केला तेव्हाही तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले.
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगने रेड कार्पेटवर स्टायलिश एन्ट्री केली. मात्र, यादरम्यान चाहत्यांना दोघांमधील एक गोष्ट आवडली नाही. कार्यक्रमात रणवीरने दीपिकाचा हात पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा दीपिकाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि पुढे निघून गेली. व्हायरल व्हिडिओमध्ये ज्यामध्ये रणवीर सिंग दीपिकाची वाट पाहत आहे. दीपिका पदुकोण तिच्या कारमधून खाली उतरते. जेव्हा रणवीरने दीपिकाला रेड कार्पेटवर येण्यासाठी हात पुढे केला तेव्हा ती त्याच्याकडे दुर्लक्ष करते.
हा व्हिडीओ समोर आल्यानंतर चाहत्यांची चिंता वाढली आहे. एका यूजरने लिहिले की, ‘तिची बॉडी लँग्वेज पूर्णपणे बदलली आहे… मला वाटते, याआधीही त्यांच्यात भांडण झाले होते.’ दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘दीपिका रागावली आहे, तिने तिचा हात धरला नाही.’ आणि चाहत्याने लिहिले, ‘काहीतरी गडबड आहे… रोमान्स लवकरच संपल्यासारखे वाटते.’