मुंबई – राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘3 इडियट्स’ हा चित्रपट बॉलिवूडमधील सर्वात प्रतिष्ठित चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट 2009 साली प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम केले.
View this post on Instagram
अभिनेता आमिर खान सह, आर माधवन, शर्मन जोशी, बोमन इराणी आणि अभिनेत्री करीना कपूर खान स्टारर या चित्रपटाने प्रेक्षकांना खूप प्रभावित केले. त्याचवेळी चाहतेही या चित्रपटाच्या सिक्वेलची मागणी बऱ्याच दिवसांपासून करत होते.
अशातच अभिनेत्री करीना कपूरने देखील तिच्या ताज्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये तिच्या विचित्र प्रतिक्रियेसह ‘3 इडियट्स’चा सिक्वेल येत असल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे.
करिनाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या क्लिपमध्ये करीनाने एक फोटो शेअर केला आहे आमिर, आर माधवन आणि शर्मन जोशी पत्रकार परिषदेत बसलेले छायाचित्र दिसत असून त्यावर ‘3 इडियट्स’ही लिहिले आहे.
या फोटोकडे बोट दाखवत करीना म्हणते, “मला आत्ताच कळलं की मी सुट्टीवर गेलो होते आणि हे तिघे पत्रकार परिषदे घेत आहे हे शर्मन जोशीच्या चित्रपटाचे प्रमोशन आहे मला वाटते की ते सिक्वेलची योजना आखत आहेत. पण फक्त हे तिघे पण माझ्याशिवाय कसा पूर्ण होणार? बोमनला याची जाणीव असेल असे मला वाटत नाही. आता मी बोमनला फोन करून बघतोय की काय चाललंय? तिन्ही नक्कीच सिक्वेल घेऊन येत आहेत.