मुंबई – शिवसेना शिंदे (Shivsena group) गटातील 40 आमदारांच्या अपात्रतेविषयीच्या प्रकरणावर आज (20 ऑक्टोबर) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यासमोर सुनावणी पार पडली. विधानसभा अध्यक्ष आमदार अपात्रतेच्या प्रकरणी सुनावणी घेण्यासाठी दिरंगाई करत असल्याने या संदर्भातील याचिका ठाकरे गटाचे नेते अनिल परब (anil parab) यांच्याकडून करण्यात आली. यानंतर सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश डी. वाय.चंद्रचूड यांनी राहुल नार्वेकर यांना सुनावले होते. त्यानंतर आता राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेप्रकरणी 34 याचिका एकत्र करण्याचा निर्णय घेतला आहे.
ठाकरे गटाने (thackeray group) सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घेण्याची मागणी केली होती. मात्र, शिंदे गटाने या मागणीस विरोध केला होता. यासंबंधी आज राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी झाली. या 34 याचिका वेगवेगळ्या गटांत याचिका दाखल केल्या आहेत. त्यानुसार वेगवेगळ्या दिवशी सुनावणी घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर 25 ऑक्टोबरपर्यंत कागदपत्रं सादर करण्यास यावेळी सांगण्यात आले आहे. या प्रकरणी आता पुढील सुनावणी 26 ऑक्टोबर रोजी निश्चित करण्यात आली आहे.
राहुल नार्वेकरांची नाराजी
राहुल नार्वेकर (Rahul narvekar) यांनी आज नाराजी वक्त केली. दरवेळेस वेगवेगळ्या याचिका अर्ज दाखल केले जातात. त्यात वेळ घालवला जातो. येथे एक भूमिका आणि सर्वोच्य न्यायालयात वेगळी भूमिका का घेता, असा सवाल राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटाला केला. जर मी सुनावणी घेत आहे, तर सर्वोच्च न्यायालयात सादर केलेली कागदपत्रे माझ्यासमोर सादर करा, अशा सूचना राहुल नार्वेकरांनी दिल्या.
असे असतील सहा गट
वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीस गैरहजर राहणे
दुसऱ्या बैठकीस उपस्थितीत न राहणे
स्पीकर विरोधात मतदान करणे
बहुमत चाचणीवेळी झालेले मतदान
भरत गोगावले यांनी दाखल केलेली याचिका
अपक्ष आमदारांसंदर्भातील याचिका