मुंबई – कथित मनी लॉंड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांची प्रकृती गंभीर असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी मान्य केले. त्यामुळे त्यांना जामीन मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांच्या जामीन अर्जावर पुढील आठवड्यापासून गुणवत्तेनुसार सुनावणी घेण्याचे उच्च न्यायालयाने आज मान्य केले आहे.
दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांशी संबंध असलेल्या मालमत्तेच्या व्यवहारासंदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने त्यांच्या विरोधात मनी लॉंडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना 23 फेब्रुवारी 2022 रोजी अटक केली होती. वैद्यकीय कारणास्तव आणि खटल्यातील गुणवत्तेवर जामीन मिळावा यासाठी त्यांनी गेल्या वर्षी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
या आठवड्यात मलिक यांचे वकील अमित देसाई यांनी अल्प युक्तिवाद केल्यानंतर, न्यायमूर्ती कर्णिक यांनी शुक्रवारी सहमती दर्शवली की मलिक गंभीर आजाराने ग्रस्त आहेत.
BS Yediyurappa : येडियुरप्पांची सक्रिय राजकारणातून निवृत्ती, म्हणाले” आपल्याला भाजपने अन्यायकारक…”
त्यामुळे त्यांच्या जामीन अर्जावर पुढील आठवड्यापासून गुणवत्तेवर आधारीत सुनावणी केली जाईल. मलिक यांची एक किडनी बाद झाली आहे आणि दुसरी किडनी कमकुवतपणे काम करत आहे.