न्यूयॉर्क : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध काही केल्या थांबत नसल्याचे दिसत आहे. त्यातच आता युक्रेनने रशियावर ड्रोन हल्ला केल्याचा गंभीर आरोप रशियाने केला आहे. युक्रेनने राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांना जीवे मारण्यासाठी क्रेमलिनवर ड्रोन हल्ला केला असल्याचा दावा सरकारने केला आहे. रशियन वृत्तसंस्थेच्या हवाल्याने यासंबंधीचं वृत्त एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिले आहे.
‘प्लान्ड टेररिस्ट ॲक्शन’ असे क्रेमलिनने या हल्ल्याला म्हटले आहे. या हल्ल्यात ड्रोन्सचा वापर केला असल्याचे रशियाने म्हटले आहे. रशियन सुरक्षा यंत्रणेने हल्ल्यासाठी वापरलेले दोन्ही ड्रोन्स नष्ट केले आहेत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन पूर्णपणे सुरक्षित असल्याचेही क्रेमलिनकडून सांगण्यात आले आहे. तसेच अध्यक्षांच्या इमारतीचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही.
The Kremlin under a drone attack.
Something tells me that Putin’s three-days-long walk in the park to seize Kyiv is not going very well. pic.twitter.com/QiRvUPeVbM— Illia Ponomarenko 🇺🇦 (@IAPonomarenko) May 3, 2023
रशियाचे अध्यक्ष सुरक्षित असून त्यांचे नियोजित कार्यक्रम सुरू आहेत. त्यांच्या कार्यक्रमांमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही. दरम्यान, क्रेमलिनने युक्रेनवर ड्रोन हल्ल्याचा आरोप केला असला तरी या हल्ल्याचा कोणताही पुरावा त्यांनी सादर केला नाही. दुसऱ्या बाजूला युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी क्रेमलिनवरील ड्रोन हल्ल्याबाबत एक निवेदन जारी केले आहे. या हल्ल्याशी युक्रेनचा संबंध नसल्याचे युक्रेन सरकारने म्हटले आहे. तसेच लवकरच युक्रेन रशियावर मोठा हल्ला करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
युक्रेन पाठोपाठ रशियाने देखील या हल्ल्यानंतर एक निवेदन जारी केले आहे. त्यात रशियाने, ‘ज्यांनी हा हल्ला केलाय, त्यांना आम्ही सोडणार नाही, असे म्हटले आहे. तसेच रशियात ड्रोनवर बंदी घालण्यात आली आहे. यासह रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी एक आपत्कालीन बैठक बोलावली आहे. या बैठकीत सुरक्षाविषयक तसेच या हल्ल्याबाबत काही मुद्दे मांडले जातील.