कोरेगा – भाटमवाडी (ता. कोरेगाव) गावच्या हद्दीत वडाचीवाडी ते खिरखिंडी रस्त्यावर एका दुचाकीस्वारास अडवून पोलीस असल्याचे सांगत सव्वा लाखाचे दागिने लंपास केल्याची घटना घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वडाचीवाडी ते खिरखिंडी रस्त्यावर असलेल्या पेट्रोल पंपाजवळ दुचाकीवरुन निघालेल्या पांडुरंग बाळू सपकाळ (रा. खिरखिंडी) यांना दोन अनोळखी व्यक्तींनी अडवले. आम्ही पोलीस आहोत, आम्हाला मदत करा, अशी बतावणी करत त्यांनी सपकाळ यांना बोलवण्या गुंतवले.
यावेळी सपकाळी यांच्याकडून सोन्याची अंगठी व चेन तोतयागिरी करुन लंपास केली. ही फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर सपकाळ यांनी त्यांचे एक लाख 20 हजार रुपये किंमतीचे दागिने अज्ञातांनी फसवणूक करुन चोरुन नेल्याची तक्रार कोरेगाव पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे.