Sanjay Shirsat meet Thackeray। राज्यात मागील काही दिवसांपासून राज ठाकरेंच्या महायुतीसोबतच्या युतीच्या चर्चांना उधाण आले आहे. दिल्लीवारीनंतर आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी राज ठाकरेंची भेट घेतलीय. राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर ही भेट झाली असून, दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली. विशेष म्हणजे या बैठकीत राजकीय चर्चा झाली. युतीबाबत देखील चर्चा झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय. मात्र, राज ठाकरेंच्या भेटीत कोणतीहीराजकीय चर्चा झाली नसल्याचे शिरसाट म्हणालेत.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या भेटीनंतर आता राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार असल्याच्या चर्चा सुरु आहे. मात्र, मागील आठवड्यापासून ही चर्चा थांबली असतानाच, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट थेट राज ठाकरेंच्या भेटीला पोहचलेत. त्यामुळे पुन्हा एकदा राज ठाकरे महायुतीत दाखल होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
थोडीफार राजकीय चर्चा होत असतेच Sanjay Shirsat meet Thackeray।
दरम्यान राज ठाकरेंच्या भेटीनंतर शिरसाट यांनी, “राज ठाकरेंचे आणि आमचे आधीपासूनच एक वेगळे संबंध आहे. शिवसेनाप्रमुखांच्या मराठवाड्यात जेव्हा सभा व्हायच्या, त्यावेळी राज ठाकरे आवर्जून बाळासाहेबांच्या सोबत असायचे. शिवसेनाप्रमुख म्हणायचे मनभेद नसायला पाहिजे, त्याप्रमाणे त्यांचाही आणि आमचाही कुठेही मनभेद नाही. फार दिवसांची इच्छा होती राज ठाकरेंना भेटायची, त्यांच्यासोबत गप्पा मारायची, त्यामुळे यात कोणत्याही राजकीय गप्पा झाल्या नाही. थोडीफार राजकीय चर्चा होत असते. परंतु आता पुढे काय करायला पाहिजे, यांनी काय करायला हवे याबाबत चर्चा झाली नाही. जुन्या आठवणींना उजाळा देण्याचे काम आम्ही केलं असे शिरसाट म्हणाले.
तुमच्यासाठी रेड कार्पेट टाकणारे आम्ही असणार… Sanjay Shirsat meet Thackeray।
आजच्या बैठकीत मी कोणताही प्रस्ताव वगैरे आणलेला नाही. असे प्रस्तावाचे काम वरिष्ठ पातळीवर होतात. माझ्यासारख्या मार्फत एखादा प्रस्ताव जाईल याची कल्पना देखील करू शकत नाही. आजच्या भेटीत फक्त चहा आणि जुन्या आठवणींवर गप्पा झाल्या. तसेच राज ठाकरे यांना मी पहिल्यापासून सांगतो साहेब तुम्ही यायला पाहिजे. तुमच्यासाठी रेड कार्पेट टाकणारे आम्ही असणार आहोत. राज ठाकरे आमच्या सोबत आल्यास नक्कीच महायुतीला याचा फायदा होणार आहे. महायुतीची आणखी ताकद वाढेल आणि जागा निवडून येतील असे शिरसाट म्हणाले.