मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस ‘संदीप देशपांडे’ यांच्यावर हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे. सकाळी शिवाजी पार्क येथे मॉर्निंग वॉकला गेल्यावर त्यांच्यावर हल्ला झाला असल्याचं सांगण्यात आलं आहे. हल्लेखोर चेहऱ्यावर मास्क लावू आले होते. आणि संदीप देशपांडे यांना स्टम्पने मारहाण केली असून, या हल्ल्यात देशपांडे गंभीर जखमी झाले आहेत.
सध्या त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुंबईसारख्या देशाची आर्थिक राजधानी असलेल्या शहरात हा हल्ला झाल्याने या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता मनसे कोणते आक्रमक पाऊल उचलणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्याची बातमी राज्यभर वाऱ्यासारखी पसरली आहे. मनसेचे नेते, संदीप देशपांडे हे एक कट्टर मनसैनिक म्हणून ओळखले जातात. ते सोशल मीडियावर मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात.